Friday, May 17, 2024
Homeनाशिकतरुणास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

तरुणास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

त्रिमूर्ती चौक परिसरात काही कारण नसताना एकाला लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्यांच्या डोक्याला व पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयसिंग धोंडु धांडा (वय 42, रा. कन्फर्ट झोन, अंबड) हे शुक्रवार (दि .8) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने त्रिमुर्ती चौक येथील शिवाबार या देशी दारू दुकानावरुन घरी जात असताना हॉटेल आदित्य समोर त्यांच्या ओळखीचे दोन इसम भेटले असता ते त्यांच्याशी बोलत असताना पाठिमागुन पल्सर या दुचाकीवरून वरिल तीन इसम आले.

त्यापैकी संशयित अंडया (पूर्ण नाव माहीत नाही) याने काहि कारण नसताना त्याच्या हातातील रॉड सारख्या हत्याराने धांडा यांच्या डोक्यात व पाठिवर मारून गंभीर दुखापती केली तसेच त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार यांनी देखील त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर कोल्हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या