Thursday, May 2, 2024
Homeनाशिकशिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

पुणे। प्रतिनिधी

परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (दि.12) जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल 20.83 टक्के लागला आहे.

- Advertisement -

निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीचे एकत्रित 31 हजार 428 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून दि. 16 फेब्रुवारी रोजी राज्यभरात पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेचा अंतरिम निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला होता. त्यानंतर शाळांमार्फत गुणपडताळणीचे अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून यानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

परीक्षेत पाचवीचे 1 लाख 36 हजार 821 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी 16 हजार 684 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच आठवीचे 57 हजार 567 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर 14 हजार 744 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाचवीचा निकाल 24.82 टक्के तर आठवीचा निकाल 15.07 टक्के लागला आहे. एकूण निकाल 20.83 टक्के लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या