Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रेल्वे विभागात नोकरीस लावुन देतो असे आमिष दाखवुन (By showing the lure of getting a job in the railway department )१कोटी १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक (Financial fraud ) करणाऱ्या संशयितास नांदगाव पोलिसांनी ( Nandgaon Police )अटक केली.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव,ता.नांदगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,ईघे व त्यांचे सहकारी संशयित ज्ञानेश नथु सुर्यवंशी ( रा.पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव ) याच्या हनुमाननगर नांदगाव येथे असलेल्या सायबर कॅफेवर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जात असे.

सूर्यवंशी याने त्यांचा विश्वास संपादन करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशाला भरत आहे, मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीस लावुन देतो, असे सांगुन टी.सी. पदासाठी १५ लाख रूपये व गेटमन पदासाठी १२ लाख रूपये लागतील असे सांगुन त्यांची सतिष गुंडू बुच्चे ( रा. घर नं. ९, सदगुरू हाईटस्, पुणे, ता. जि. पुणे ), संतोष शंकरराव पाटील ( रा. वंडरसिटी, कात्रज, ता. जि. पुणे ) यांच्यासोबत ओळख करून दिली.

संशयितांनी बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्ती पत्र व सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, मुंबई, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई आणि राणी मुखर्जी हॉस्पिटल उत्तर रेल्वे दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाले असल्याचे सर्टीफिकेट देवुन इघे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून १ कोटी १५ लाख रूपये घेवुन फसवणुक केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि ईश्वर पाटील, अंमलदार भारत कांदळकर, अनिल शेरेकर, सुनिल कु-हाडे, सागर कुमावत, संदिप मुंढे यांचे पथकाने सदर प्रकरणाचा तपास करत संशयित सूर्यवंशी यास अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या