Saturday, October 12, 2024
Homeनाशिकफाइन आर्ट्सच्या कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर

फाइन आर्ट्सच्या कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी सीईटी) २०२० चे काऊन्सेलिंग शेड्युल सीईटी कक्षाने जाहीर केले आहे…

- Advertisement -

बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (बीएफए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे वेळापत्रक सीईटी कक्षाने mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले असून ज्या उमेदवारांना या कोर्ससाठी कॅप राउंडसाठी नोंदणी करायची आहे, ते या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली आहे.

बीएफए काउन्सेलिंग कॅपसाठी नोंदणीची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२० आहे. कागदपत्रांची ई-पडताळणी ७ आणि ११ डिसेंबर रोजी होणार आहे. अंतिम यादी १४ डिसेंबर रोजी जाहीर होईल. mahacet.org वर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांना यादी पाहता येईल.

हरकती घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ११.५९ पर्यंतचा वेळ आहे. अधिक माहिती आणि वेळापत्रकासाठी उमेदवारांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या