Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रPune Airport : माझ्याकडे बॉम्ब आहेत; माथेफिरु महिलेमुळे पुणे विमानतळावर खळबळ

Pune Airport : माझ्याकडे बॉम्ब आहेत; माथेफिरु महिलेमुळे पुणे विमानतळावर खळबळ

पुणे । Pune

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७२ वर्षांच्या वृद्ध महिलेनं पुणे विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. विमानतळावर सेक्युरिटी चेकदरम्यान वेळ लागत असल्यानं या महिलेनं चक्क विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आपल्याजवळ बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या या महिलेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर फिस्कींग बुथमध्ये अधिकारी व सहकारी हे कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी महिला निती प्रकाश कपलानी ही महिला चेकिंग पाईंटवर आली. ”मेरे चारों तरफ बम लगा है” असे तिने विमानतळावरील पोलिसांना सांगितले. यानंतर विमानतळावरील प्रशासनाची धावपळ उडाली. पोलिसांनी या महिलेची तपासणी केली तर काहीच आढळून आले नसल्याने तिच्याविरुद्धात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खोटी माहिती का दिली, अशी विचारणा पोलिसांनी केली. त्यावर महिला म्हणाली की, मी मस्करी केली होती. दरम्यान या महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगितले जात आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल दिपाली झवारे यांच्या तक्रारीवरुन या महिलेविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पुण्यात २ दहशतवाद्यांना पकडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण आहे. अशात या महिलेने आपल्याकडे बॉम्ब असल्याची खोटी माहिती विमानतळावरील चेकिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दिली. यामुळे विमानतळावर भीतीचे वातावरण पसरले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या