Saturday, May 3, 2025
Homeदेश विदेशSonu Nigam: गायक सोनु निगमला पहलगाम हल्ल्याविषयी वक्तव्य करणं भोवलं; FIR दाखल

Sonu Nigam: गायक सोनु निगमला पहलगाम हल्ल्याविषयी वक्तव्य करणं भोवलं; FIR दाखल

मुंबई | Mumbai
बॉलिवूडसह देशातील अनेक भाषांमध्ये गाणारा आणि गोड गळ्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गायक सोनु निगमने अनेक भाषांमध्ये गाणी गात गायकाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांनी सोनू निगमने जगभरात चाहते कमावले आहे त्याची अनेक गाणी खुप प्रसिध्द झाली आहे. मात्र यंदा सोनु निगम एका कॉन्सर्ट शो दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोनू निगमने कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने कन्नड गाण्याची फर्माइश केली असता त्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने, सोनू निगमवर FIR दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय प्रकरण आहे?
सोनु निगम हा बेंगळुरु येथे कॉन्सर्ट शोसाठी गेला होता. त्या शोमध्ये सोनु गाणे गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणे गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केले. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

https://www.instagram.com/reel/DI4F-F8hxal/?utm_source=ig_web_copy_link

सोनू निगम सर्वांसमोर म्हणाला की, “या चाहत्याच्या जन्माआधीपासून मी कन्नड गाणी गातोय. याच कारणाने पहलगाममध्ये हल्ला झाला. अशाच वागणुकीमुळे तिथे हल्ला झाला”, अशाप्रकारे सोनू निगमने चाहत्याने जी मागणी केली होती त्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी सोनू निगमच्या असंवेदनशील वागण्यावर बोट ठेवले आहे.

https://www.instagram.com/p/DJHcv2JteUZ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

चाहत्याच्या मागणीची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने बंगळुरु येथील अनेक कन्नड संघटनांनी अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनू निगमविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ (१), ३५२ (२) आणि ३५३ अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळी अपमान आणि शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याने, सोनू निगमविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “पंतप्रधान मोदी नऊ तास नट-नट्यांसोबत…”; राऊतांचा निशाणा, नेमकं...

0
मुंबई | Mumbai जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची...