Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवाडीवऱ्हे जवळील कारखान्यात आग; एक जण गंभीर जखमी

वाडीवऱ्हे जवळील कारखान्यात आग; एक जण गंभीर जखमी

घोटी | जाकीर शेख Ghoti

- Advertisement -

नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे जवळील जय दुर्गा कंपनीला आज दुपारी आग लागून कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून येथे काम करत असलेला राजकुमार सिंग वय 22 हा जखमी झाला. त्यांना नरेंद्र महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन बंबानी आग आटोक्यात आणली घटनास्थळी वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे पोलीस नाईक प्रवीण काकड, तलाठी धोडपकर, महावितरण चे अभियंता आगरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पुढील तपास वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...