Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर नियंत्रण : कोरोना लस सुरक्षित

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर नियंत्रण : कोरोना लस सुरक्षित

सीरम इन्स्टिट्यूटमधील आग तब्बल चार तासांनी नियंत्रणात आली आहे. अग्नीशमन दलाकडून आता कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. वेल्डींग काम सुरु असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

कोव्हिशील्ड लस सुरुक्षित आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवण्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही.

- Advertisement -

कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मितीचं काम हे गेट नंबर 3, 4 आणि 5 या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर या आगीचा कुठलाही परिणाम होणार नाही.

सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून कोणताही जिवितहानी झाली नाही, असं पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या