Wednesday, November 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजस्वामीनारायण मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांच्या खोलीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

स्वामीनारायण मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांच्या खोलीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

​पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

स्वामीनारायण मंदिराच्या आवारात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या खोलीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत खोलीतील गाद्या, भांडी आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जळून खाक झाले असले, तरी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

​
स्वामीनारायण मंदिर परिसरात सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व विश्रांतीसाठी एक खोली बांधण्यात आली आहे. या खोलीत अचानक आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या तीन बंबांना पाचारण करण्यात आले होते. यापैकी एक बंब बॅकअप म्हणून राखीव ठेवण्यात आला होता. जवानांनी इमारतीच्या पुढील आणि मागील अशा दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करत अवघ्या काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यामुळे मुख्य मंदिर परिसराकडे आग पसरण्याचा धोका टळला.

ताज्या बातम्या

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरता स्थगित; उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या मध्यस्थीनंतर...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ न्यायालयीन कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयीन कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनक्षेणी लागू.करण्यात यावी या न्यायहक्काच्या मागणीसाठी कनिष्ट न्यायालयीन कर्मचार्‍यांनी पुकारलेला बेमुदत संप आज...