राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील वाणीमळा परिसरात शेतातील विद्युत रोहित्र (डीपी) (Electrical Transformer) बदलण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून (Electric Shock) खाजगी वायरमन प्रकाश देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू (Private Wireman Death) झाला. बुधवार, दि. 18 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील वाणीमाळा परिसरातील एका शेतात डीपी बदलण्याचे काम सुरू होते. यावेळी खाजगी वायरमन प्रकाश देशमुख हे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा (Electricity Supply) सुरू झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्युत रोहित्र बदलण्यासारखे जोखमीचे काम सुरू असताना विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता का? काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित ठेकेदाराने योग्य प्रकारे पार पाडली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. केवळ चौकशी करून प्रकरणावर पडदा टाकू नये, तर दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. एका विद्युत कामगाराचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू (Death) होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत कामांदरम्यान आवश्यक सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि कामगारांच्या जीविताच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




