Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिन्नरमध्ये जुन्या इमारतीला आग

सिन्नरमध्ये जुन्या इमारतीला आग

दुसरा मजला पूर्णपणे जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

शहरातील पडकी वेस परिसरातील धारणकर गल्लीत एका जुन्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (दि. 24) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. आगीमुळे इमारतीचा दुसरा मजला पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने या इमारतीत बऱ्याच वर्षांपासून कुणी राहत नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

धारणकर गल्ली येथे सुनील बत्रा यांची जुनी लाकडी इमारत आहे. बऱ्याच वर्षांपासून या इमारतीत कुणी राहत नाही. इमारतीचे छत लाकडापासून बनवण्यात आलेले आहे. तसेच खिडक्या व दरवाजेही लाकडाचे आहे. इमारतीच्या चहूबाजूने रहिवासी भाग असून मोठ्या इमारतीही आहे. आग लागलेल्या इमारतीत कुणी राहत नसल्याने छतावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. सायंकाळी अचानक इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छताला आग लागली. छतावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतल्याने काही वेळातच आगीने इमारतीच्या पाठमागील बाजूचे छत आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर धुराचे लोट लांबूनच दिसू लागले.

नगरसेवक हर्षद देशमुख यांनी घटनेची माहिती सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती देताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच एमआयडीसीचे अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहचले. दोन बंबांच्या साहाय्याने एक तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास जवानांना यश आले. दरम्यान, आग लागल्यानंतर वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनीही तात्काळ घटनास्थळी येत परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

सदर इमारत ही अरुंद रस्ता आणि जुने बांधकाम असल्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागला. आग लागल्यानंतर आग बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. आग लागल्याच्या सुरुवातीला नगरसेवक देशमुख यांच्यासह नगरसेवक उदय गोळेसर, नगरसेवक प्रताप देशमुख, सुशांत काळे यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजूने जाऊन पेट घेऊ शकतात अशा वस्तू काढून बाहेर टाकल्या. तसेच अग्निशमन बंबाचे पाईप वरपर्यंत नेण्यास जवानांना मदत करत पाठीमागील बाजूने राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सिन्नर नगरपरिषद अग्निशमन दलाचे लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, सागर डावरे, वैभव केदार, एमआयडीसी अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक संदीप पाटील, फायरमन गणेश वाघ, हेमराज चव्हाण, सागर पाटील, मोहन पाटील, नरेंद्र कुमावत, राहुल नवले, आदित्य घुगे, संतोष जायभावे, निलेश पवार यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...