Sunday, October 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : "अर्थखातं आमच्या हक्काचं, हिवाळी अधिवेशनापूर्वी.."; मंत्री भुजबळांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर...

Chhagan Bhujbal : “अर्थखातं आमच्या हक्काचं, हिवाळी अधिवेशनापूर्वी..”; मंत्री भुजबळांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या ५०० कोटींच्या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यातच आता अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अर्थखात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेत अर्थखाते पुन्हा आपल्याकडे देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मकता दर्शवली असून, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे खाते राष्ट्रवादीला मिळेल, अशी माहिती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

- Advertisement -

‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) खासदार पार्थ पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि जय पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की,”सुनेत्रा ताई पवार या आमच्या पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अर्थखाते हे आमच्या हक्काचे असून ते आम्हाला परत मिळणार होते. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले असल्यामुळे नक्कीच सकारात्मक विचार होईल. ” असे त्यांनी म्हटले.

विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या आणि ५ मंत्री पक्ष बदलणार असल्याच्या चर्चांना भुजबळांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. “अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. विलिनीकरणाबाबत आमच्याकडून कोणतीही चर्चा झालेली नाही आणि आम्ही कधीही वेळ मागितलेली नाही,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच इतर कोणतेही खाते अदलाबदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खाते कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांची भूमिका

अर्थखाते नेमके कधी मिळणार यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “सध्या राज्यासमोर दुष्काळाचे गंभीर प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना पहिला अग्रिम हप्ता म्हणून ५,००0 रुपयांची मदत दिली जात आहे. तसेच कर्जमुक्ती योजना आणि निधीची जुळवाजुळव या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सक्तीची तारीख मागितली नसली, तरी दुष्काळी परिस्थिती व इतर बाबींचा विचार करून हिवाळी अधिवेशनापूर्वी हे खाते निश्चितपणे आम्हाला दिले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महायुतीमध्ये एकत्रितपणे चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. सध्या राज्याच्या राजकीय व आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष आगामी घडामोडींकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Scam : तत्कालीन अधिकारीही कचाट्यात; संशयितांना नोटीस, चौकशीअंती अटकेची...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाथर्डी शिवारात (Pathardi Area) बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडाचे आरक्षित क्षेत्र हडपण्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. २५ वर्षांनंतर अचानक उघडकीस...