Wednesday, November 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक विभागात पाणीसाठ्यात ७.७४ टक्के घट

नाशिक विभागात पाणीसाठ्यात ७.७४ टक्के घट

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाच्या सरासरीत मोठी घट झाली असून, याचा थेट परिणाम नाशिक विभागातील पाणीसाठ्यावर झाला आहे. विभागातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ७.७४ टक्क्यांंंनी घट झाली आहे. परतीचा पाऊसही न झाल्याने ऑटोबर महिन्यापासूनच पाणी पातळी वेगाने खाली जात असून, आगामी काळात संपूर्ण नाशिक विभागात आणि पर्यायाने राज्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शयता वर्तवली जात आहे.

नाशिक महसूल विभागात २२ मोठे, ४७ मध्यम आणि २८९ लघु असे एकूण ३५८ जलप्रकल्प आहेत. यांची एकूण उपयुक्त जलधारण क्षमता ५,८६५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) इतकी आहे. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ८३.३१ टक्के (४,८८९.२४ दलघमी) साठा शिल्लक आहे. गतवर्षी याच काळात विभागात ९१.०५ टक्के साठा उपलब्ध होता. विभागातील लघु प्रकल्पांना याचा सर्वाधिक फटका बसला असून, त्यामधील साठ्यात तब्बल १८.३८ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे.

विभागात सर्वाधिक म्हणजे २९.३७ टक्के घट अहिल्यानगर जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहे. तेथील भंडारदरा, मुळा आणि निळवंडे या मोठ्या प्रकल्पांतील साठा वेगाने घटल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, कश्यपी, मुकणे आणि गिरणा या प्रकल्पांतील पाणी साठ्यातही घट होत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा आणि वाघूर या मोठ्या प्रकल्पांतील साठा ८७.८८ टक्क्यांंवर आला आहे. नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांत आजमितीस समाधानकारक साठा दिसत असला, तरी पुढील उन्हाळ्याचा काळ लक्षात घेता प्रशासनाला उपलब्ध पाण्याचे अत्यंत नियोजनबद्ध आणि जपून वापर करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित हॉटेल

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शिर्डी विमानतळ परिसरात उभारण्यात येणार्‍या पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि...