Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत ५ जणांचा मृत्यू

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत ५ जणांचा मृत्यू

पुणे | Pune

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला (Serum Institute building fire) आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

- Advertisement -

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एकूण सहा कर्मचारी अडकलेले होते त्या सर्व कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. वेल्डींग काम सुरु असतांना ही आग लागली.

अपघातातील मृतांची नावे :

बिपिन सरोज – उत्तर प्रदेश

रमा शंकर – उत्तर प्रदेश

सुशील कुमार पांडे – बिहार

महेंद्र इंगळे – पुणे

प्रतीक पाष्टे – पुणे

सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या