Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशदिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग! घटनास्थळी आठ अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल

दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग! घटनास्थळी आठ अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

दिल्लीतील एम्समध्ये आज सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आपत्कालीन विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे कळते. अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी पोहोचले असून सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

- Advertisement -

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीटीआयने ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पीटीआयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे.’

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एम्सच्या एण्डोस्कॉपी कक्षात ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या ठिकाणी असलेल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत असून लवकरात लवकर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.माहितीनुसार, ११.५४ वाजता आग लागली असल्याचे समोर आले, त्यानंतर अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी दाखल झाली. इमर्जन्सी वॉर्डजवळील एण्डोस्कॉपी कक्षात ही आग लागली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या