Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशराजधानीत भीषण अग्नितांडव! २६ जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरु

राजधानीत भीषण अग्नितांडव! २६ जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरु

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीत भीषण आगीचा घटना घडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील….

- Advertisement -

एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या तीन मजली इमारतीला शुक्रवारी (१३ मे) सायंकाळी अचानकपणे आग लागली. ही आग एवढी भीषण होती की आग लागल्याचं लक्षात येताच अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आगीनं भीषण रुप धारण केल्यानं बहुतेक जण अडकून पडले होते. काही लोकांनी तर जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या