Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअंबड औद्योगिक वसाहतीत आग: कोट्यवधींचे नुकसान

अंबड औद्योगिक वसाहतीत आग: कोट्यवधींचे नुकसान

नवीन नाशिक प्रतिनिधी :

अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत आग लागल्याने कोट्यवधी रुपयांची मशीन तसेच इतर साहित्य जळून खाक झाले.

- Advertisement -

रविवार ( दि.31 ) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीमधील अमोल इंडस्ट्रीज हया कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली त्याची माहिती ऑपरेटर मुकुंद सोनवणे याना फोन द्वारे देण्यात आली .घटनेची माहिती मिळताच त्वरित अग्निशमन. अंबड चा एक बंब आणि नवीन नाशिक येथील चे दोन बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत पाच मोल्डींग मशीन ,सि सि टिव्ही कॅमेरे, कच्चा माल आणि तयार मटेरियल जळून खाक झाले . सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन नवीन नाशिक विभागाचे केंद्र प्रमुख देविदास चांद्रमोरे ,लिडिंग फायरमन रवींद्र लाड, फायरमन मोयोद्दीन शेख,सोमनाथ शिंदे, संजय गाडेकर,कांतीलाल पवार ,अविनाश सोनवणे, वाहन चालक इस्माईल काजी, सुनील घुगे, आदींनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

- Advertisment -

ताज्या बातम्या