Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानांदगाव स्थानकात बस जळून खाक

नांदगाव स्थानकात बस जळून खाक

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

गेल्या काही दिवसांपासून चालत्या वाहनाला आग लागल्याच्या घटना वारंवार घडत आहे. नांदगाव आगराची बस आज सायंकाळी चाळीसगाव येथून नांदगाव बस स्थानकात येऊन चालक,वाहक आणि प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर काही वेळेतच बसच्या खाली चालकाला आग लागलेली दिसली असता काही क्षणातच बसने पेट घेतला त्यात पूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे मोठे संकट टळले.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव आगराची बस आज सायंकाळी चाळीसगाव येथून नांदगाव बस ( क्रमांक एमएच 07 -9337) ही प्रवाशी सोडून बसस्थानकात येऊन उभी राहीली होती. चालक डी.ए.थोरे , वाहक ए.एस.ताडगे आणि बसमधील प्रवासी हे बसमधून खाली उतरले. बसच्याखाली उतरल्यावर चालक थोरे हे वाहतूक नियंत्रक कक्षात नोंदणी करायला गेले. तिकडून येत असताना त्यांना नंतर बसच्या खाली धुर दिसला. त्यानंतर बसला आग लागलेली दिसली. त्यांनी आगार व्यवस्थापक विश्वास गावीत यांना दुरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली.

नांदगाव आगारातील कर्मचारी व यांत्रिक कर्मचार्‍यांनी आग विझवण्यासाठी धावपळ केली. कर्मचारी क्रांती निळे , राहुल पगारे , प्रकाश पेहरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच 8 युनिट अग्नीशमन बंब आणून आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला केला गेला. परंतु वारा वाहत असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नांदगाव परिषदेकडे अग्निशमन बंब आहे पण अधिकारी व कर्मचारी नसल्याने कर्मचार्‍यांनी खाजगी पाणी टँकर बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत बस ने संपूर्ण पेट घेतला.अथक प्रयत्न करून बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यास नांदगाव आगारातील स्थानिक कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी यांचे प्रयत्न तोकडे पडले. आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यात बस जळून खाक झाली. नंतर मनमाड येथील अग्निशमन दलाला पाचारण केले त्यांनी घटनास्थळी धाव घेत बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले.

- Advertisment -

ताज्या बातम्या