Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात या ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी!

नाशकात या ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी!

नाशिक l Nashik

नाशिक शहरात कलम 144(1) (3)आदेश लागू आहे. तसेच कोविड 19 संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचना जसे मास्कचा वापर, सामाजिक आंतर बंधनकारक राहणार आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये कंटेमेंट झोन, पूर्व घोषित शांतता क्षेत्र व सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास १० नोव्हेंबरपासून बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संदर्भात दिनांक 07/11/2020 रोजी राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये तज्ञ व्यक्तींनी आगामी काळात कोरोना संसर्गाची संभाव्य वाढ तसेच वायू प्रदूषणाचा होणारा परिणाम याबाबत उचित दक्षता घेण्याबाबत सूचित केले.

या पार्श्वभूमीवर जिल्हयांत नियंत्रित होत असलेल्या संसर्गात वृध्दी होऊ नये यादृष्टीने वायू प्रदूषण करणा-या फटाक्यांवर नियंत्रण आणणे अनिवार्य झाले असल्याने, त्यादृष्टीने वायू प्रदूषण करणारे कोणतेही प्रकारचे फटाके कंटेमेंट झोन तसेच पूर्व घोषित शांतता क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याबाबत दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रात्री 12.00 पासून पुढील आदेशा पर्यंत पूर्णत: प्रतिबंध  करणेत येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या