मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) संसर्गाचा प्रभाव वाढत असून मृत्यूची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. पुण्यानंतर आता मुंबईतही या आजाराने एकाचा बळी घेतला आहे.
नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा व्हेंटिलेटरवर असतानाच मृत्यू झाला. मुंबईत GBS मुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. ही व्यक्ती २८ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. वडाळा येथे राहणारी ५३ वर्षीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात कक्ष सेवक म्हणून कार्यरत होती.
त्यांना ताप येत असल्याने २८ जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील पाण्यासह विविध तपासण्या केल्यानंतर त्यांना जीबीएसची लागण झाल्याचे लक्षात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते.
मात्र सोमवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणासह राज्यातील एकूण मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तज्ज्ञांनी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे.
आजाराची लक्षणे
- अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणं.
- अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे.
- डायरिया (जास्त दिवसांचा)
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे.
- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे.
- नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा