Tuesday, April 28, 2026
HomeनगरAhilyanagar : ग्रामपंचायतच्या 64 जागांसाठी आज पोटनिवडणूक

Ahilyanagar : ग्रामपंचायतच्या 64 जागांसाठी आज पोटनिवडणूक

21 जागा बिनविरोध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी व रिक्त झालेल्या सदस्यपदांच्या 85 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. यातील सदस्यपदाच्या बिनविरोध आलेल्या जागा वगळून इतर सर्व जागांसाठी आज मंगळवार (दि. 28) सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 यावेळेत मतदान पार पडणार असून 29 एप्रिल रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. 2022 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजीनामा, निधन, अनहर्त यासह इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यात 85 ग्रामपंचायत सदस्य व 5 सरपंचपदांचा समावेश होता.

- Advertisement -

या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. संबंधित तहसीलदार यांनी मतदानाचे पूर्ण नियोजन केले असून मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. थेट सरपंचपदासाठी अकोले, राहुरी, नेवासा, शेवगाव व जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत असून आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक शाखेने सांगितले.

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीच्या 85 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील 21 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यात अकोले तालुक्यातील 7 जागा, शेवगाव व कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी 3 जागा, नगर व नेवासा तालुक्यातील प्रत्येकी 2 जागा, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व पाथर्डी तालुक्यांतील प्रत्येकी 1 जागा बिनविरोध निवडून आली आहे. यामुळे आज 64 जागांसाठी मतदान होणार आहे.

अशा आहेत जागा
अकोले 33, संगमनेर 3, कोपरगाव 4, राहाता, श्रीरामपूर, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड आणि कर्जत प्रत्येकी 1, शेवगाव 5, राहुरी 5, नगर आणि नेवासा प्रत्येकी 4 यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...