Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमधील 'त्या' प्रकरणाबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, …

नाशिकमधील ‘त्या’ प्रकरणाबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, …

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काल शनिवारी (दि.२२ जून) रोजी शहरातील पंचवटी (Panchvati) येथील राजवाडा परिसरात एका समाजकंटकाने काही आक्षेपार्ह पत्रके वाटली होती.काळाराम मंदिर आणि परिसरात काही विशिष्ट समाजातील लोकांना प्रवेश वर्ज्य असल्याचे यामध्ये म्हटले होते.त्यामुळे या पत्रकावरून काल चार तास पंचवटी भागात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या समाजकंटकाला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाबाबत आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : वादग्रस्त पत्रकामुळे नाशकात तणाव; पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

या प्रकाराबाबत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, त्या पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी (Police) काढलेली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले आहे. हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधले जात आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिक्षकांना पैसे वाटप; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

तसेच या प्रकारानंतर काही राजकीय नेत्यांनी हे आक्षेपार्ह पत्रक ट्विट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना फडणवीस म्हणाले की, या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल. यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे म्हणत त्यांनी राजकीय पुढाऱ्यांचे कान टोचले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

दरम्यान,नाशिक पोलिसांनी त्या समाजकंटकाकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. तसेच त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशीही नाशिक पोलिसांकडून केली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या