सिन्नर | वार्ताहर | Sinnar
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या (Sant Nivruttinath) पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण (Ringan) आज (दि. २५) सायंकाळी तालुक्यातील दातली (Datli) येथे रंगले. पालखीच्या (Palkhi) दर्शनसाठी व रिंगण सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर
आज सकाळी सिन्नर शहरवासीयांचा (Sinnar City) अल्पोपाहार व दुपारी कुंदेवाडीकरांच्या आमरस- पुरणपोळीचा आस्वाद घेतल्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी हजारो वारकऱ्यांसह दातली येथील रिंगण सोहळा मैदानावर दाखल झाली. यावेळी जिल्ह्याभरातून (District) आलेल्या हजारो भाविकांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. रिंगण सोहळ्यासाठी चार एकर जागेत हा भव्य दिव्य रिंगण सोहळा पार पडला.
हे देखील वाचा : Nashik News : नाशकात डेंग्यू रुग्णसंख्या दोनशे पार
यावेळी दातलीकरांकडून रिंगण मैदानावर (Ground) भव्य रांगोळी काढून फुलांचा सडा टाकला होता. रिंगण सोहळा सुरु झाल्यानंतर वायुवेगाने अश्वमेध धावण्यास सुरुवात झाली. यावेळी भक्ती सागरात बुडालेल्या वारकर्यांनी रिंगणामध्ये धाव घेत फेरा पूर्ण केला. यावेळी तालुक्यातील (Taluka) लोकप्रतिनिधी राजकीय मान्यवरांनी रिंगण सोहळ्यास भेट देत दर्शन घेतले.
हे देखील वाचा : Nashik News : पोलीस भरतीतील मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू
दरम्यान, यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनकडूनही (MIDC Police Station) कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस सेवक, होमगार्ड तसेच जिल्हा मुख्यालयाकडूनही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दातली ग्रामस्थांच्या वतीने स्वयंसेवकांची साखळी तयार करण्यात आली होती.
हे देखील वाचा : पावसाच्या माहेरघरावर वरुणराजाने फिरवली पाठ; धरणं पडली कोरडीठाक
पालखीवर पुष्प वर्षाव
भक्तिमय वातावरणात निवृत्तिनाथांच्या पालखीचे दातली येथे आगमण होताच दातलीकरांनी पालखीवर पुष्पवर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी केली. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी दातलीच्या वेशीवर आल्यानंतर भजनी मंडळाने टाळ मृदंगाच्या गजरात रिंगण सोहळ्याच्या ठिकाणापर्यंत पालखीचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा