Tuesday, December 10, 2024
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर

Nashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर

दमदार पावसाची प्रतीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रविवारी झालेल्या पावसाने (Rain) बळीराजाला थोडा दिलासा मिळाला असला तरी आजही नऊ धरणे (Dam) अक्षरशाः कोरडी आहेत. धरणांमधील पाणीसाठा (Water Reservoir) अवघा ७.६८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : संपादकीय : २५ जून २०२४- जनतेची कामे झाली पाहिजेत

कालचा पाऊस आज पहाटेपर्यत सुरु होता. २४ तासांत १३.७ मिलीमीटर पाऊस झाला. आजही पाऊस पडेल असे वाटत होते. मात्र दिवसभर कोरडे वातावरण राहिले. कमाल तापमान (Maximum Temperature) ३० अंशांवर गेले होते. हवामान खात्याने आज जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता. मात्र काहीच वातावरण जाणवले नाही.

हे देखील वाचा : Nashik Crime News : घरझडतीत दीड लाखांचा गुटखा जप्त

काल दिवसभारत नाशकात (Nashik) १३.५ मिलीमीटर पाऊस झाला. तर जिल्ह्यातील भोजापूर, नागासाक्या, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, भावली, ओझरखेड, माणिकपुंज ही धरणे अक्षरशा कोरडी पडली आहेत.तसेच काल दुपारी सुरगाणा तालुक्यातील जामदरी येथील भिलाजी दगडू तांबे यांच्या दोन शेळ्या आणि १ मेंढी वीज पडून मृत्यू पावली. तसेच सोनू बाळू गोटे यांना विजेचा धक्का बसला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : खैरतस्कर ‘पुष्पा’ जेरबंद; वनविकास महामंडळाची कारवाई

दरम्यान, कळवण तालुक्यात (Kalwan Taluka) काल झालेल्या पावसामुळे मुलुखवाडीच्या पुढील निवाणे बारीत कळवण रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे. हा रस्ता खुला करण्याचा प्रयत्न बांधकाम विभाग करत आहे. अभियंत्यांना सदर रस्ता खुला करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची सूचना करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या