Friday, May 17, 2024
Homeनाशिकबम बम भोले...! पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो भाविक महादेवाच्या चरणी लीन

बम बम भोले…! पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो भाविक महादेवाच्या चरणी लीन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्रावणी सोमवारनिमित्त (Shravani Somvar) शहरातील विविध शिव मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple) दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाची कपालेश्वर पालखी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी कपालेश्वर भगवानचे दर्शन घेतले…

- Advertisement -

तसेच कैलास मठात शिवलक्षार्चन सोहळा पार पडला. यावेळी शेकडो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. कैलास मठातील पुरोहीतांनी दिवसभर शिवलक्षार्चन केले. हा महोत्सव दरवर्षी महिनाभर होतो. यंदा शुक्रवारपासून हा महोत्सव सुरु झाला असून 27 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

कैलास मठात शिव सहस्त्र नामावलीचे पठण करण्यात आले. पूजेसाठी वापरलेली सर्व फळे व वस्तू अनाथाश्रम व वृद्धाश्रम या ठिकाणी वाटण्यात येणार असल्याची माहिती मठाचे स्वामी सविदानंद सरस्वती यांनी दिली. मंगळवारी नागपंचमी (Nagpanchami) यात्रेसाठी मखमलाबाद तवली डोंगरावरील नागमंदीर सजले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या