Saturday, May 4, 2024
Homeक्रीडापिंच्याक सिलाट स्पर्धेत पाच जणांंना सुवर्ण

पिंच्याक सिलाट स्पर्धेत पाच जणांंना सुवर्ण

घोटी । प्रतिनिधी Ghoti

मोडाळे(ता. इगतपुरी)येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पिंच्याक सिलाट असोसिएशन ऑफ नाशिक Pencack Silat Association of Nashik ग्रामीण व नाशिक पिंच्याक सिलाट असोसिएशन सिटी आयोजित 2 री नाशिक जिल्हास्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धा Nashik District Level Pencack Silat Competition 2021-22 मोठ्या उत्साहात पार पडली.या स्पर्धेत पाच जणांनी सुवर्णपदक प्राप्त केले.

- Advertisement -

या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प .सदस्य गोरख बोडके, सरपंच मंगलाताई बोंबले, अनिल गोरे, गजीराम शेंडगे, संजय धात्रक, किसन बोडके, ज्ञानेश्वर झोले, ग्रामसेवक नाना खांडेकर, मुख्याध्यापक जगदीश मोरे, मुख्याध्यापिका चंद्रभागा तुपे,दत्तू दातीर, सचिन गवई ,रतीराम पटेल, अजय पाटील व तृप्ती बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ही स्पर्धा तुंगल, रेगु, गंडा, ट्याडिंग या चार प्रकारात पार पडली. या स्पर्धेत 3 वर्षापासून ते 45 वर्ष वयातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.संपूर्ण नाशिकमधील 8 तालुक्यातील 150 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. या स्पर्धेतून जिंकलेल्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेसाठी करण्यात आली.

पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून स्वसंरक्षणाच्या दृष्टीने सर्वात प्रभावी मार्शल आर्ट आहे. विशेष म्हणजे नुकताच या खेळाचा समावेश केंद्र शासनाच्या क गटाच्या नोकर भरतीत झालेला आहे.

तसेच या खेळाला ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया,क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, भारतीय खेळ प्राधिकरण, भारतीय विश्वविद्यालय संघ, ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड इत्यादी मान्यता आहेत.पिंच्याक सिलाट खेळाचा समावेश एशियन गेम्स, युथ गेम्स, सी गेम्स, बीच गेम्स , ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स अशा विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील मानाच्या व प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये खेळला जातो.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नागेश बनसोडे, आकाश धबडगे, राहुल बोंबले, योगेश पानपाटील, भारत जाधव, निखिल साबळे, राजूराम जयस्वाल , सचिन विश्वकर्मा, शुभम शर्मा, कलाकार पथक मोडाळे, संपत मेदडे, भाऊसाहेब मेडडे यांनी परिश्रम घेतले.

हे आहेत विजेते

सुवर्ण पदक विजेते खेळाडू:करण गोरे, गौरी बोडके, साहिल धात्रक, साईशा धात्रक, निशा बागुल. रौप्य पदक विजेते खेळाडू: सानिका गोवर्धने, कृष्णा धात्रक. कांस्य पदक विजेते खेळाडू: श्रद्धा कदम, कार्तिक बोंबले, ज्ञानराज गोर्‍हे, श्रद्धा कदम.

- Advertisment -

ताज्या बातम्या