मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारने मंगळवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कापूस महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांची नियुक्ती मुंबईत विशेष आयुक्त, राज्य कर या पदावर झाली आहे. तर राज्य करचे विशेष आयुक्त अभय महाजन यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य कापूस महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर झाली आहे.
इगतपुरी (जि. नाशिक) उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांची बदली नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे .तर मुख्यमंत्री सचिवालय नागपूर येथील सहसचिव आशा अफजल खान पठाण यांची बदली वनामती, नागपूरचे महासंचालक पदी करण्यात आली आहे.
याशिवाय त्यांच्याकडील मुख्यमंत्री सचिवालय नागपूर येथील सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.




