Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोदावरी नदीच्या पूरात अडकलेल्या पाच जणांची सुटका; अग्निशमन दलाची कामगिरी

गोदावरी नदीच्या पूरात अडकलेल्या पाच जणांची सुटका; अग्निशमन दलाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

गोदाघाटावरील टाळकोटेश्वर मंदिरात गोदापात्रात वाढलेल्या पाण्यामुळे अडकलेल्या पाच जणांना वाचविण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. गोदाघाटावर अश्या प्रकारे अडकणाऱ्या व बुडणाऱ्यांना अग्निशंमक दलाचे अधिकारी व कर्मचारी नेहमीच वाचविण्याचे काम करत असतात, त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक्त होत आहे.

YouTube video player

प्रभू श्री रामचंद्रांच्या परस्पर्षाने पावन झालेल्या पंचवटी भूमीत देशांतूनच नव्हे तर अवघ्या जगभरातून भक्त भाविक पर्यटक येत असतात. पावसाने जवळपास दिवसभर शहरासह गंगापूर धरण क्षेत्र परिसरात सुरू होता. यांमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग हा वेळोवेळी सुरू आहे. भक्त भाविक व पर्यटकांसह स्थानिक नागरिक देखील पाण्याच्या पातळी वाढली की बघण्यासाठी गर्दी करत असतात.

मंगळवार (ता.२३) रोजी कार्तिक जाधव, निखिल अहिरे, अक्षय लोट, राहुल तिडके, सुनिल कसोटे पूजे साठी टाळ कोटेश्वर मंदिरात होते. पाऊस सुरु असल्याने अचानक गोदापात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने हे पाच जण मंदिरात अडकले.ही बाब अग्निशामक दल कार्यालयात सुजाण नागरिकांनी संपर्क करून अग्निशमन दलास कळविले.

सदर घटनास्थळी अग्निशमन केंद्राच्या बंब क्रमांक अधिकारी व कर्मचारी पोहचले. सदर अडकलेल्या व्यक्तीस लाईफ रिंग व दोर च्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे,वाहनचालक बी व्ही काकडे, , लीडिंग फायरमन पी पी बोरसे,डी पी पाटील, गणेश रकीबे, सिद्धांत गोतीस,ऋषिकेश जाधव, ऋषिकेश खताळे यांनी कामगिरी आदींनी बजाविली.

नाशिक शहरासह गंगापूर धरण परिसरात सद्यस्थितीमध्ये पाऊस सुरू आहे. वेळोवेळी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रामतीर्थावरील गोदाघाट पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. गोदाघाट परिसरात दर्शनासाठी तसेच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास बघण्यासाठी येणाऱ्या स्थानिक नागरिक , भक्त भाविक पर्यटक यांनी माहिती नसेल अशा ठिकाणी पाण्यात उतरू नये, सोबत असलेल्या लहान मुलांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाचे फायरमन संजय कानडे यांनी केले आहे

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...