Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाICC Test Rankings : टॉप १० मध्ये भारताचे 'हे' पाच खेळाडू

ICC Test Rankings : टॉप १० मध्ये भारताचे ‘हे’ पाच खेळाडू

मुंबई । Mumbai

भारतात सध्या आयपीएलची (IPL) रणधुमाळी सुरु आहे. पाकिस्तान वगळता इतर संर्व देशांचे खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. नुकतीच आयसीसी कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर करण्यात आली आहे. भारतीय कसोटी संघासाठी (Indian Test team) खुशखबर म्हणजे टीम इंडियाचे ५ शिलेदार आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल १० स्थानांमध्ये आहेत.

- Advertisement -

भारताकडून आर अश्विन (R Ashwin) रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) या टीम इंडियाच्या ५ खेळाडूंचा अव्वल १० स्थानांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानी आहे. तर विराट कोहली १० व्या स्थानावर विराजमान आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास आर अश्विन दुसऱ्या तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच अष्टपैलूंमध्ये रविंद्र जडेजाने अव्वल स्थान कायम राखले आहे. फलंदाजी क्रमवारीत बांगलादेशचा लिटन दास (Litton Das) आणि श्रीलंकेचा अष्टपैलू अँजीलो म्यॅथुज (Angelo Mathews) यांना क्रमवारीत बढती मिळाली आहे.लिटन दास १७ व्या तर म्यॅथुज २१ व्या स्थानी विराजमान आहे.

नुकत्याच सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत (Sri Lanka vs Bangladesh test series) दोन्ही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मर्नास लबुशेन (Marnus Labuschagne) पहिल्या तर स्टीव्ह स्मीथ (Steve Smith) दुसऱ्या क्रमांकावर आहे. केन विलियम्सन (Kane Williamson) तिसऱ्या, जो रूट (Joe Root) चौथ्या तर बाबर आझम (Babar Azam) पाचव्या स्थानी आहे.

गोलंदाजीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्या तर आर अश्विन जसप्रीत बुमराह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहे. तर चौथ्या स्थानी पाकिस्तानचा डावखुरा लेफ्ट आर्म गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) तर पाचव्या स्थानी न्यूझीलंडचा कायल जेमिसन (Kyle Jamieson) आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या