Friday, April 25, 2025
Homeक्राईमफ्लॅटच्या नावाखाली नोकरदाराची 18 लाखांची फसवणूक

फ्लॅटच्या नावाखाली नोकरदाराची 18 लाखांची फसवणूक

यशश्री कन्स्ट्रक्शनच्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

फ्लॅट देण्याच्या नावाखाली एका नोकरदाराची 18 लाख रूपये फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. संदीप श्रीमल भळगट (वय 42 रा. सिव्हील हाडको, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

यशश्री कन्स्ट्रक्शनचे मनिष शेषमल भंडारी (रा. माळीवाडा, अहिल्यानगर) व वैशाली राजकुमार सोनसळे (रा. सोहम हेरीटेज भक्ती मंदिर रस्ता, पांचपगठी, ठाणे वेस्ट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 2013 मध्ये संदीप भळगट यांनी सारसनगर येथील समृध्दी एन्क्लेव्ह येथील फ्लॅट क्र. 204 विकत घेण्यासाठी यशश्री कन्स्ट्रक्शन सोबत व्यवहार केला. त्यांनी एचडीएफसी बँकेच्या चेक व कर्जाच्या माध्यमातून एकूण 18 लाख रुपये दिले होते. त्यांनी सांगितलेल्या फ्लॅट क्र. 204 चे खरेदीखत नोंदवून देण्यात आले, परंतु जेव्हा संदीप भळगट यांनी फ्लॅटचा ताबा मागितला, तेव्हा त्यांना कळाले की सदर फ्लॅट आधीच रमणलाल गांधी यांना विकला गेला होता.

त्यानंतर, मनीष भंडारी यांनी चुकून फ्लॅट क्र. 204 चा उल्लेख केला असल्याचे सांगितले व चूक दुरूस्तीचा दस्त तयार केला. तरीही, त्यांना फ्लॅट क्र. 203 चा ताबा दिला नाही. तो फ्लॅटही साळवे कुटुंबियांना विक्री केला असल्याचे तपासणीतून समोर आले. मनिष भंडारी व वैशाली सोनसळे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप भळगट यांनी केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...