Friday, May 17, 2024
Homeनगरपहिल्या मजल्यावर पोहचण्यासाठी त्यांनी लढवली शक्कल !

पहिल्या मजल्यावर पोहचण्यासाठी त्यांनी लढवली शक्कल !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी तयार केलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले आहे. जिन्याचा व्हिडीओ ट्विट करून महिंद्रा यांनी जिन्यांची निर्मिती करणार्‍यांची स्तुती केली आहे.

- Advertisement -

दरबार फॅब्रिकेशनने नगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत फोल्डिंग जिना बनवला. हा जिना फोल्ड करून भिंतीला लावतो येतो. त्यामुळे जेव्हा जिन्याचा वापर करायचा असेल तेव्हाच तो जिना काढता येतो आणि इतर वेळी तो भिंतीला लॉक करता येतो. हा जिना बनवल्यानंतर समीर बागवान यांनी त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला. हा व्हिडीओ महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी पाहिला. त्यांनी व्हिडीओ ट्विट केला.

अतिशय अरुंद जागेत उभारण्यात आलेल्या जिन्याचे आनंद महिंद्रांनी कौतुक केले आहे. अप्रतिम. अतिशय साधं, पण सृजनशील. यामुळे घराच्या सामान्य भिंतीचं सौंदर्य वाढलं आहे. स्कॅन्डिनेव्हियन डिझाइनरनादेखील यामुळे आपला हेवा वाटेल, अशा शब्दांत महिंद्रा यांनी जिना आणि त्या जिन्याची निर्मिती करणार्यांचं कौतुक केलं आहे. महिंद्रा यांना ट्विट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे.

तर या व्हिडिओवर पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. थेट आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याने आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना दरबार फॅब्रिकेशनचे समीर बागवान यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या