Friday, May 3, 2024
HomeनाशिकNashik Crime News : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई;...

Nashik Crime News : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई; ‘इतक्या’ लाखाचा गुटखा जप्त

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

शहरातील नवीन नाशिक परिसरातील (New Nashik Area) त्रिमूर्ती चौकाजवळील (Trimurti Chowk) शिवशक्ती चौक येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा (Raid) टाकून तब्बल ०१ लाख १८ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त (Gutkha Sezied) केला आहे…

- Advertisement -

Dada Bhuse : “माझी हवी तर चौकशी करा पण…”; ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारेंच्या आरोपावर मंत्री दादा भुसेंचे स्पष्टीकरण

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (Department of Food and Drug Administration) अधिकाऱ्यांना नवीन नाशिकमधील त्रिमूर्ती चौकाजवळील शिवशक्ती चौक येथे गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी याठिकाणी छापा टाकला असता येथील शिवम ट्रेडर्सचे मालक संदीप मुसळे यांच्या दुकानात (Shop) २२ हजार ४१४ आणि गोदामात लपवून ठेवलेला ९५ हजार ६१६ असा एकूण ०१ लाख १८ हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.

Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने

त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुसळे यांचे दुकान आणि गोदाम सील केले असून त्यांच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station)भादवि कलम ३२८ व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान ही कारवाई सहआयुक्त न भा, नारागुडे, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप आणि सी. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. पाटील, अ. उ. रासकर आणि अविनाश दाभाडे, यांच्या पथकाने केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायडोंगरीत पुन्हा खून; दगडाने ठेचून एकाची हत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या