Friday, May 3, 2024
Homeनाशिकपेठ ग्रामीण रुग्णालयासाठी जनरेटरची मागणी मंजूर

पेठ ग्रामीण रुग्णालयासाठी जनरेटरची मागणी मंजूर

पेठ । Peth

पेठ ग्रामीण रुग्णालयासाठी जनरेटरची मागणी मंजूर झाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

पेठ ग्रामीण रुग्णालयात रात्रीचे वेळी विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णांचे अतोनात हाल होत असतानांच कित्येक महिलांची प्रसुती अक्षरशा:हा मेणबत्तीवर करण्याची नामुष्की अनेक वेळेस ओढावली होती.

त्याबाबत अनेक वेळेस ओरड होऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. मात्र कोवीडच्या रूग्णासाठी ग्रामीण रुग्णांलयाचा काही भाग आरक्षित करुन तेथे ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यावर मोठी समस्या निर्माण होऊ शकली असती मात्र सुदैवाने तशी वेळ आली नाही.

मात्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालयासाठी जनरेटर प्राप्त झाल्यने महत्वाची समस्यादूर झाली आहे. यावेळी जनरेटर अनावरण करण्यात आले.

यावेळी तहसिलदार संदीप भोसले, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या