Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशForbes च्या भारतातील Top10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर

Forbes च्या भारतातील Top10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर

दिल्ली | Delhi

फोर्ब्सने २०२१ मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली.

- Advertisement -

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा फोर्ब्सच्या भारतातील पहिल्या १० अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. ५ मार्च २०२१ पर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८४.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. उल्लेखनीय म्हणजे, फोर्ब्सच्या ३५ व्या वार्षिक जगातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी १० व्या स्थानावर आहेत. तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानी आहेत. अदानी यांची संपत्ती ५०.५ अब्ज डॉलर्स इतकी मोजण्यात आली आहे.

अरबपत्तींची संपत्तीत वाढ होत असल्याने शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आहे. देशात करोना संसर्ग वाढत असला तरी याचा फायदा उद्योगपतींना होताना दिसतोय. गेल्या वर्षी बेंचमार्क सेंसेक्स ७५ टक्के वाढला आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार, अरबपतींची संख्या गेल्या वर्षी १०२ वरून आत्ता १४० वर पोहचली आहे. तर त्यांची सामूहिक संपत्ती दुप्पट होत ५९६ अरब डॉलर्स झाली आहे. यात कोरोना महामारीच्या काळातही भारतातील तीन सर्वात श्रीमंतांनी एकूण १०० अब्ज माया जमा केली आहे.

अंबानींनी जिओ टेलिकॉम कंपनीत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. २०२१ पर्यंत या कंपनीने कर्जाचे उद्दिष्ट शून्यावर आण्याचे ठरवले आणि ते पूर्णही केले. आशियाच्या सर्वात श्रीमंतांमधील एक असलेल्या रिलायन्स समूहाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील नवनवीन बदल, योजना आणत मागील वर्षात मोठी गुंतवणूक केली.

भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी ठरले आहेत. अदानींच्या संपत्तीत ४२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सध्या अदानी समूहाच्या अदानी ग्रीन आणि अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्सने सध्या आभाळ गाठले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर टाइकूनने व्यवसायात वैविध्यपूर्ण बदल केले आणि भारताच्या विमानतळ व्यवस्थापन आणि ऑपरेशन व्यवसायात विस्तार केला. अदानी समूहाने यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये देशातील दुसऱ्या सर्वाधिक व्यस्त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधील ७४ टक्के हिस्सा विकत घेतला. तर अदानीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतील २० टक्के हिस्सा फ्रेंच एनर्जी कंपनीला २.५ अब्ज डॉलर्सला विकला.

एचसीएल टेक्नोलॉजीज लिमिटेडचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष शिव नादर तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर राधाकिशन दमानी भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. नुकतेच दमानी आणि त्यांच्या भावाने दक्षिण मुंबईत तब्बल १,००१ कोटी रुपयांमध्ये दोन मजली इमारत विकत घेतली आहे. दमानीची सुपरमार्केट चेन डीमार्टचे देशभरात २२१ स्टोअर्स आहेत.

पुढे उदय कोटक पाचव्या क्रमांकावर आहे. लक्ष्मी मित्तल, कुमार बिर्ला आणि सायरस पूनावाला अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप शघनवी हे नववे श्रीमंत भारतीय आहेत. भारती एंटरप्रायजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल आणि त्यांचे कुटुंबीय फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत यादीत दहाव्या स्थानावर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या