Sunday, May 5, 2024
Homeनगरबुधवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात पावसासह उष्णतेच्या लाटेचा अंदाज

बुधवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात पावसासह उष्णतेच्या लाटेचा अंदाज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शुक्रवारी रात्री राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वारा आणि गडगडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. शनिवारपासून मध्य महाराष्ट्रात येत्या 27 एप्रिलपर्यंत तूरळक ठिकाणी पावसासह तूरळक ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी नगर जिल्ह्यात देखील शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली होती. यावेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत होते.

- Advertisement -

आयएमडीच्या पुणे विभागाच्या शनिवारच्या अहवालानूसार राज्यात येत्या 27 तारखेपर्यंत कोकण आणि गोव्यात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर रविवारी (दि.24) मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून बुधवारपर्यंत तूरळक पाऊस तर उष्णतेच्या लाट येणार आहे. या कालावधी विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानूसार राज्यात 27 तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसासोबत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शनिवारी नगर जिल्ह्यात दुपारनंतर अचानक वातावरण बदल झाला. आभाळ भरून आले होते. वातावरणातील दमटपणा वाढला होता. नगरसह राज्यात कधी पाऊस तर कधी उष्णेच्या लाटेमुळे राज्यातल्या सर्वच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या