Sunday, June 21, 2026
Homeक्राईमNewasa : सव्वा लाखाची विदेशी दारु पकडली

Newasa : सव्वा लाखाची विदेशी दारु पकडली

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील नेवासा ते कुकाणा रोडवर अवैधरित्या वाहतूक होत असलेले विदेशी दारुची वाहतूक करणारे वाहन पकडून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांनी फिर्याद दिली असून त्याम म्हटले की, कुकाणा रोडवर वाहनातून (एमएच 25 पी 5601) विदेशी दारुची वाहतूक होत असल्याचे समजल्यावर अधिकार्‍यांच्या आदेशाने छापा टाकला असता टाटा कंपनीच्या वाहनामध्ये 1 लाख 28 हजार 496 रुपये किमतीच्या विदेशी दारुच्या 1082 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच टाटा कंपनीची जीप (अंदाजे किंमत दीड लाख रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या फिर्यादीवरुन वाहन चालक किरण शामराव पाटील (वय 44) रा. श्रीरामपूर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. परीविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे, हवालदार शहाजी आंधळे, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, कॉन्स्टेबल हरी धायतडक, अमोल डमाळे, कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, वाल्मीक वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना : अमोनिया गळतीने घेतले सात बळी; ४० हून अधिक...

0
. तामिळनाडू | तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरियापालयमजवळील कन्निगापैर परिसरातील एका खासगी सी-फूड प्रक्रिया आणि निर्यात कारखान्यात रविवारी अमोनिया वायूची मोठी गळती होऊन भीषण दुर्घटना घडली. या...