Sunday, May 19, 2024
HomeनगरVideo : ...अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क 'चपात्या'; प्रकरण पोहोचलं पोलिस...

Video : …अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क ‘चपात्या’; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

लोणी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यात जेरबंद केलेला बिबट्या वनविभागाने त्यांच्या लोणी येथील रोपवाटिकेत आणून ठेवला मात्र त्याची खाण्या-पिण्याची व्यवस्था न केल्याने लोकांनी त्याला अक्षरशः चपात्या खायला दिल्या.

- Advertisement -

बुधवारी वन खात्याच्या कोपरगाव कार्यालयाने पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा डाव्या कालव्यालगतच्या रोपवाटिकेत आणून ठेवला. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाचे निर्देश दुर्लक्षित करून त्याची देखभाल करण्यात कुचराई केली. त्याला प्यायला पाणी आणि खायला मांस यांची व्यवस्था न केल्याने हा बिबट्या डरकाळ्या फोडू लागला. त्याच्या आवाजाने गुरुवारी आजूबाजूचे नागरिक पिंजऱ्याजवळ जमा होऊ लागले. बिबट्याला खायला मांस लागते याची पुसटशीही कल्पना नसलेल्या एका व्यक्तीने बिबट्यावर दया दाखवून त्याला खायला चक्क चपात्या टाकल्या. बिबट्या मांसाहारी असल्याने कितीही भुकेने व्याकुळ झाला तरी तो शाकाहारी अन्न खात नाही.विशेष म्हणजे बिबट्याला चार-पाच दिवसांनी खायला मांस लागते.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

वन अधिकारी, कर्मचारी यांनी काही गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. गोगलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश ठोके हे गुरुवारी सकाळी घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना अनेक त्रुटी तेथे दिसून आल्या. एकतर बिबट्या लोकवस्तीच्या ठिकाणी ठेवणे चुकीचे आहे. त्यातच बिबट्या ठेवलेल्या ठिकाणापासून पाचशे फुटांवर जिल्हा परिषदेची शाळा असून सध्या शाळा सुरू असल्याने अनेक लहान मुले शाळेत हजर होते. पाटबंधारे विभागाचे कार्यालय आणि कर्मचारी वसाहत याच ठिकाणी आहे. त्यालगत स्थानिक नागरिकांची घरे देखील आहेत. अशा परिस्थितीत पिंजऱ्याला कुलूप लावण्याची तसदी वन कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. बिबट्या पिंजऱ्याच्या दरवाजाला जोरजोरने धडका देत होता.

टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणं ठरलं जीवघेणं, ‘त्या’ अब्जाधीशांसह पाच ही जणांचा मृत्यू… समुद्रात नेमकं काय घडलं?

जर दरवाजा उघडला गेला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता असे ठोके यांचे म्हणणे आहे.त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी पोलीस ठाण्यात वन विभागाच्या कर्मचार्यांविरुद्ध तक्रार अर्ज दिला. त्यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही मोबाईल कॉल घेतला नाही. यावेळी त्यांनी वन कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी वन विभागाने या बिबट्याचा मुक्काम दुसरीकडे हलवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या