Tuesday, March 25, 2025
Homeनगर‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची शोधमोहीम

‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची शोधमोहीम

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील देवगाव (Devgav) परिसरातातील पानोबा वस्ती येथे महिलेल्या ठार (Woman Death) केलेल्या बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शोधमोहीत हाती घेतली आहे. यासाठी 14 पिंजरे, 6 पथके, 3 शूटर, 3 थर्मल ड्रोन, 3 ट्रॅप कॅमेरे आणि शंभर अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस शोध घेत आहे. मात्र तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. मका कापत असताना योगिता पानसरे या महिलेवर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करत ठार केले होते. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या (Forest Department) विरोधात रास्ता रोको आंदोलन केले.

- Advertisement -

यानंतर खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांनी गंभीर दखल घेतली. त्यावरुन वन विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर असून देवगाव, खराडी, निमगाव टेंभी या संपूर्ण परिसरात बिबट्याची शोधमोहीम सुरू केली असून चौदा ठिकाणी पिंजरे लावले आहे. तर पुणे (Pune), नाशिक (Nashik), संगमनेर (Sangamner) अशी एकूण सहा पथके बिबट्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे तीन शूटर देखील आहेत. रात्रीच्या वेळी तीन थर्मल ड्रोनव्दरे बिबट्यावर (Leopard) वॉच ठेवला जात आहे. तसेच तीन ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहे. याचबरोबर शंभर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी काम करत आहे.

रात्रंदिवस संपूर्ण परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच पुन्हा बिबट्या (Leopard) परिसरात दिसला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. मात्र तरीही बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...