Friday, May 3, 2024
Homeनगरविहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील हिवरगाव पावसा (Hivargav Pavsa) येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या नर जातीच्या बिबट्याला (Leopard) जीवदान देण्यात वन विभागाला (Forest Department) यश आले आहे.

- Advertisement -

हिवरगाव पावसा (Hivargav Pavsa) येथे भक्ष्याचा पाठलाग करताना गुरुवारी (ता. 30) रात्री बिबट्या (Leopard) शेतकरी विजय पावसे यांच्या शेतातील बिन कठड्याच्या विहिरीत (well) पडला. ही बाब सकाळी पावसे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वनविभागाला (Forest Department) ही माहिती दिली. त्यानंतर चंदनापुरीचे वनपाल रामदास डोंगरे, वनरक्षक विक्रांत बुरांडे आदींनी सहायक कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले.

परिसरातील शेतकरी व युवकांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याची (leopard) सुखरूप सुटका केली. सुमारे तीन वर्षे वयाचा नर जातीचा हा बिबट्या असल्याचे वनपाल डोंगरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या