Friday, May 3, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार अ‍ॅरॉन फिंच निवृत्त

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार अ‍ॅरॉन फिंच निवृत्त

मुंबई | Mumbai

ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने (Aaron Finch) इंटरनॅशनला क्रिकेटच्या सर्व सामन्यातून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. फिंचने काही दिवसांपूर्वी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारणांपैकी अ‍ॅरॉन फिंच एक आहे…

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धेचं आयोजन यूएईत (UAE) करण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने विश्वविजेतेपद पटकावलं होतं. ऑस्ट्रेलिया संघाने २०२१ मध्ये प्रथमच टी २० वर्ल्डकप स्पर्धेवर आपलं नावं कोरलं होतं.

तुर्की-सीरियातील मृतांची संख्या ४ हजारांहून अधिक; WHO ने केला ‘हा’ मोठा दावा

अ‍ॅरॉन फिंचने एकूण २५४ इंटरनॅशनल सामने खेळले असून , यात ५ कसोटी , १४६ एकदिवसीय आणि १०३ टी २० सामन्यांचा समावेश आहे. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी २० सामन्यातून त्याने पदार्पण केले होते. त्याने ८८०४ धावा काढल्या आहेत. यामध्ये १७ एकदिवसीय आणि १ टी २० शतक त्याने झळकावले आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली होती.

‘आई मला माफ कर’ म्हणत तरुणीने संपवली जीवनयात्रा

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. संघाला उपांत्य फेरीतही आपलं स्थान निश्चित करण्यात अपयश आलं होतं. ऑस्ट्रेलिया संघाला साखळीतच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. संपूर्ण स्पर्धेत एरन फिंचला एकच अर्धशतक झळकावता आलं होत.

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपची ‘काटें’शी टक्कर! जयंत पाटील यांची घोषणा

२०२० मध्ये फिंचला टी २० क्रिकेटर ऑफ द इयर पुरास्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ मध्ये झिम्बावे संघाविरुद्ध हरारे येथे झालेल्या सामन्यात ७६ चेंडूत त्याने १७२ धावांची स्फोटकी खेळी खेळली होती. यामध्ये त्याने १० चौकार आणि १६ षटकार ठोकले होते.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या