Saturday, November 16, 2024
Homeक्रीडाAjay Jadeja : जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी बनला 'अजय जडेजा'; वारशात 'इतक्या' कोटींची...

Ajay Jadeja : जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी बनला ‘अजय जडेजा’; वारशात ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

जामनगर। Jamnagar

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजय जडेजा ५३ व्या वर्षी नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. जामनगरच्या राजघराण्याने शुक्रवारी अजय जडेजाला राजघराण्याच्या गादीचा वारसदार म्हणून जाहीर केले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार जामनगर राजघराण्याचे विद्यमान प्रमुख जाम साहब शत्रुसाल्यसिंहजी दिग्विजयसिंहजी यांनी अजय जडेजाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

अजय जडेजा यांना जामनगरचा पुढील उत्तराधिकारी म्हणून घोषित करताना शत्रुशल्यसिंह जी म्हणाले, मला आनंद आहे की जडेजा आता नवानगरचा पुढचा जाम साहेब असणार आहे. नवानगरवासीयांसाठी हे वरदान ठरणार आहे.

भारताचा माजी फलंदाज अजय जडेजा हा गुजरातमधील जामनगरचा आहे. तो या ठाकूर घराण्यातील आहे. अशा स्थितीत शत्रुशल्य सिंहजींना आपला वारस म्हणून निवडण्यात अजिबात संकोच वाटला नाही.

जामनगर येथील जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांना मूलबाळ नाही. अशा परिस्थितीत त्याला आपला पुढचा वारस निवडायचा होता. क्रिकेटर अजय जडेजा हा जाम साहेबांचा खूप जवळचा आणि आवडता मानला जातो. याच कारणामुळे त्याने टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवलेल्या या दिग्गज खेळाडूवर विश्वास व्यक्त केला.

शत्रुशल्यसिंह जी यांचे वडील दिग्विजय सिंह जी हे देखील 33 वर्षांपासून नवानगरचे जामसाहेब आहेत. त्यामुळे आता अजय जडेजा हा नवानगरचा पुढचा जाम साहेब असेल.

दरम्यान, जामनगरच्या राजघराण्याचा इतिहास जडेजा घराण्यातील राजा जाम रावलशी जोडला आहे. १५४० मध्ये त्यांनी नवानगर राज्याची स्थापना केली. तसेच रंगमती आणि नागमती या दोन नद्यांच्या काठावर एक किल्ला आणि महालासह आशापुरा देवीचे मंदिर बांधले असल्याची माहिती आहे.

३६ प्रकारचे राजपूत कच्छहून जाम रावल यांच्यासह जामनगरला आले होते. जाम रावल हे जाम हलाचा यांचे वंशज होते. म्हणूनच या भागाला ‘हालार’ असे संबोधले जाते. स्थानिक भाषेत ‘जाम’ या शब्दाचा अर्थ ‘सरदार’ असा होतो. जाम साहेब ही पदवी सर्वप्रथम जाम रावलजी जडेजा यांनी वापरली होती.

विशेष बाब म्हणजे जामनगरच्या राजघराण्याला क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे. प्रतिष्ठित रणजी करंडक आणि दुलीप करंडक यांना अनुक्रमे अजय जडेजाचे नातेवाईक केएस रणजीतसिंहजी आणि केएस दुलीपसिंहजी यांचे नाव देण्यात आले आहे. याच कुटुंबातील अजय जडेजाने १९९२ ते २००० पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या