Friday, May 3, 2024
Homeजळगावमाजी मंत्री गुलाबराव देवकर- अ‍ॅड.रोहिणी खडसेंमध्ये चुरस

माजी मंत्री गुलाबराव देवकर- अ‍ॅड.रोहिणी खडसेंमध्ये चुरस

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (election of District Bank) महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने (Cooperation panel) बहुमताचा आकडा सर केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सर्वाधिक 11 जागा निवडून आलेल्या आहेत.तर त्या खालोखाल शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) जागा निवडून आलेल्या आहेत. आता तिन्ही पक्षांकडून जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी दावेदारी केली जात आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथम चेअरमन पदाची संधी (Opportunity for the post of Chairman) दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीमध्ये माजीमंत्री गुलाबराव देवकर (Former Minister Gulabrao Deokar),डॉ.सतीश पाटील, अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर (Adv. Rohini Khadse-Khewalkar), अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. या चौघांपैकी कोणाला चेअरमनपदाची संधी मिळणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध करण्यासाठी मोटबांधणी संदर्भात बैठका झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये काँग्रेसला दुय्यमस्थान देत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर काँग्रेसने यूटर्न घेत सर्व जागा लढण्याविषयी दंड थोपटले आणि सर्वपक्षीय पॅनलमधून काँग्रेस बाहेेर पडले. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने काढता पाय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठस्तरावरुन सर्वपक्षीयऐवजी महाविकास आघाडी करण्याचा संदेश आला आणि भाजपाला एकटे पाडून महाविकास उदयास आली. महाविकास आघाडीने आपसात जागा वाटप करुन जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. मात्र,आता चेअरमन-व्हाईस चेअरमनपदासाठी कोणत्या पक्षाला किती वर्षाचा कार्यकाळ मिळणार याविषयी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे, माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी नेत्यांचे अंतर्गत एकमत झाले असलेतरी जिल्हा बँकेवर चेअरमन कोण? अशी उत्सुकता लागून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक 11 जागा निवडून आलेल्या आहेत.तर त्या खालोखाल 6 जागा शिवसेना आणि काँग्रेसच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत. तर भाजपची एक जागा निवडून आलेली आहे. सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक निवडून आले असल्याने मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दावा करीत आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्या मुंबईत भेटीगाठी घेतल्या जात आहे. मात्र एकनाथराव खडसे चेअरमनपदासाठी इच्छुक नसले तरी कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासाठी वरिेष्ठस्तरावरुन फिल्डींग लावली जात असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या