Thursday, May 2, 2024
Homeनगरओबीसी आरक्षणाचा निर्णय आनंददायी

ओबीसी आरक्षणाचा निर्णय आनंददायी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) ओबीसी बांधवांचा आरक्षणासाठी (OBC Reservation) सातत्याने पाठपुरावा केला असून आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला निकाल हा ओबीसी समाजासह (OBC Society) आम्हा सर्वांसाठी आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Former Minister MLA Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

- Advertisement -

इलेक्ट्रिक कंपनीच्या व्यवस्थापक व लिपिकास लाच घेतांना रंगेहात पकडले

ओबीसी आरक्षणा (OBC Reservation) बाबत प्रतिक्रिया देताना आमदार थोरात (Former Minister MLA Balasaheb Thorat) म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने बांठिया समितीची (Banthia Committee) स्थापना केली होती. या समाजाला आरक्षण मिळावे याकरीता सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा अहवाल मंजूर केला असून 27 टक्के आरक्षण मिळाले आहे.

..अखेर निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम पुर्ण

हे ओबीसी समाज (OBC Society) व आम्हा सर्वांसाठी आनंदाचे आहे. या आरक्षणाप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections to Local Bodies) लवकरात लवकर व्हाव्यात. कारण कोणतीही निवडणुक वेळेत व्हावी ते लोकशाहीसाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया आमदार थोरात यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या