Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारशिवसेनेचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा

शिवसेनेचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

सर्व सामान्याच्या हिताचे (common good) हे सरकार (government) आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची (funds for development) कमतरता पडू देणार नाही. धडगाव व नंदुरबार नगरपालिकेला (Dhadgaon and Nandurbar Municipality) 20 कोटी रुपयांच्या निधी (20 crores of funds) देण्यात येईल त्याचप्रमाणे धडगाव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी तात्काळ मंजुरी दिली शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल रविवारी सायंकाळी पाठिंबा (supports) दिला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

काल रविवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नंदुरबार पालिका,धडगाव नगरपंचायत,सेना जि.प सदस्य त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा पत्रे दिली आहेत.

शिवसेनेच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याने राज्यात गेल्या महिन्यात राजकीय घडामोडी होऊन सत्ता परिवर्तन होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची वर्णी लागली. आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील एकनाथ शिंदेंना पाठींबा दर्शविला.राज्यातील अनेक महानगरपालिका,नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत असे असतांना नंदुरबार जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कोण कोण सामील होणार याची उत्सुकता लागलेली होती.

शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले होते.गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निरीक्षक नंदुरबारात आल्यावर त्यांनी माजी आ.चंद्रकांत यांच्या समर्थक,कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

त्यावेळी शिंदेंना पाठिंबा देण्याचे एकमत झाले होते.काल रविवारी सायंकाळी मुंबई येथे रघुवंशी गटातील नंदुरबार नगरपालिका,धडगाव नगरपंचायत,नंदुरबार पंचायत समिती, जि.प पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील जवळपास हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याची पत्रे देण्यात आली.

शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील अनेज स्थानिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. प्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या