Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaju Shetti : "...तर तो दोष अजित पवारांचा"; मंत्री कोकाटेंच्या 'त्या' वक्तव्यावरून...

Raju Shetti : “…तर तो दोष अजित पवारांचा”; मंत्री कोकाटेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टींचा दादांना टोला

नाशिक | Nashik

कृषीमंत्रीपद हे ओसाड गावची पाटीलकी असे जर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणत असतील तर तो दोष उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (DCM Ajit Pawar) आहे. त्यांच्याकडे ११ वर्ष अर्थखाते आहे. त्यांचे अपयश कोकाटे यांनी बोलून दाखवले, असा टोला माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार यांनी प्रायचीत्त घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आज नाशिक (Nashik) शासकीय विश्रामगृह येथे राजू शेट्टी यांनी राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झालेले नुकसान, मायक्रोफायनान्स कंपन्याकडून सुरू असलेली लुबाडणूक, कृषीमंत्र्यांचा कारभार, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान, कारागृह घोटाळा यासह विविध विषयावर संवाद साधला.

YouTube video player

यावेळी ते म्हणाले की,”गेल्या ६ मे पासून पाऊस (Rain) सुरु झाला असून, प्रचंड नुकसान झाले. डाळिंब फळाची गळती झाली, कांदा चाळी भोवती पाणी साचून तो खराब झाला. उन्हाळी कांद्याचे, भाजीपाल्याचे नुकसान भरुन निघणे अवघड आहे. एवढे होऊनही कृषिमंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य सुरूच आहेत. आता अजितदादांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे” असे शेट्टी यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “आज दिवसाला आठ शेतकर्‍यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) होत आहेत. शेतकरी सुखी समाधानी होण्यासाठी ‘बजेट’मध्ये भरीव तरतूद करायला हवी होती. मात्र, सरकार जराही मदत करायला तयार नाही. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (NDCC Bank) एक हजार कोटी भांडवल दिले तर बँक तग धरु शकेल, पण अद्याप दिलेले नाही. फक्त व्याज सवलत दिली आहे. त्यामुळे चार आजारी बँका ज्याने नीट केल्या त्याला सोडून जावे लागले” असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

तसेच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानी बाबत ते म्हणाले की, “वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करणे गरजेचे झाले आहे. कारण बिबटे वाढले आहेत. शेतात अधिक लहान मुलांवर हल्ले (Attack) होत आहेत. बिबट्या आता जंगलात राहत नाही, मानवी वस्ती जवळ राहत आहेत. गवे,डुक्कर व बिबटे यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वन्यजीव कायद्यात बदल करावे लागतील. बदलत्या जीवनशैलीमुळे हे घडत आहे. महाराष्ट्राची व्याप्ती पाहिली तर शेतकरी संख्या कमी पण नुकसान जास्त दिसत आहे. शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसत आहेत.त्यामुळे कांद्याला पैसे मिळायची वेळ येईल तेव्हा सानुग्रह अनुदानची भुकटी न लावता भरीव मदत करावी”, असं देखील राजू शेट्टी म्हणाले.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...