Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशमाजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांना करोनाची लागण

माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांना करोनाची लागण

नवी दिल्ली –

देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे नेते एच.डी. देवगौडा यांना करोनाची लागण झाली आहे. देवगौडा यांच्या

- Advertisement -

पत्नी चेन्नमा यांचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. देवगौडा यांनी बुधवारी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

एच. डी. देवगौडा यांनी बुधवारी ट्विट केले, माझी पत्नी चेन्नमा आणि माझा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच आम्हीदेखील आयसोलेशनमध्ये आहोत. मागील काही दिवसात आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या शुभचिंतकांना विनंती करतो, की घाबरुन जावू नका.

87 वर्षीय देवगौडा 1 जून 1996 पासून 21 एप्रिल 1997 या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते. याशिवाय ते कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या