Thursday, May 2, 2024
Homeनगरशिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांचे निधन

शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांचे निधन

कोपरगाव l तालुका प्रतिनिधी l Kopergaon

शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व जेष्ठ पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर (वय ६५) यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्यावर नाशिक येथे करोनाचे उपचार सुरू होते.

- Advertisement -

त्यांच्या पच्छात पत्नी मीनल खांबेकर, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व.अशोक खांबेकर यांचे वडील भीमाशंकर खांबेकर हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे व काँग्रेसचे खंदे समर्थक व शिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. अशोक खांबेकर हे ही अखेरपर्यंत काँग्रेसचे समर्थक होते. त्यांनी नगर जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठे योगदान दिले. त्यांनी पी.टी.आयचे पत्रकार म्हणूनही अनेक वर्षे सेवा केली.

त्यांनी आपल्या पत्नीला दोनदा कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष व काही काळ प्रभारी अध्यक्ष बनविण्यात मोलाची भूमिका निभावली होती. त्यांचा जनसंपर्क भारतभर पण दांडगा होता. साई संस्थानमध्ये त्यांची व माजी विश्वस्त डॉ. एकनाथराव गोंदकर यांची कारकीर्द संस्थानच्या हिताची ठरली होती. त्यांनी अनेक संस्थान अहिताचे निर्णय समितीला फिरवायला लावले होते.

त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. करोना उपचारादरम्यान नाशिक येथे खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालवली आहे. त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या