Thursday, May 2, 2024
Homeनगरआरोग्य खात्यात नोकरीला लावण्यासाठी तरूणाकडून घेतले चार लाख

आरोग्य खात्यात नोकरीला लावण्यासाठी तरूणाकडून घेतले चार लाख

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

करोना काळात आरोग्य खात्यात नोकरीला लावून देतो म्हणून तिघांनी एका तरूणाकडून चार लाख रूपये उकलत त्याची फसवणूक केली आहे. सागर आण्णासाहेब घाडगे असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमनाथ सहादु पातकळ, माहेश्‍वरी ऊर्फ राणी सोमनाथ पातकळ (हल्ली रा. गजानन कॉलनी, नागापूर, मुळ रा. चापडगाव ता. शेवगाव), शरद एकनाथ ढिसले (रा. कर्‍हे टाकळी ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेल्या तरूणाचे मामा योगेश भाऊसाहेब गुडघे (वय- 36 रा. बोल्हेगाव फाटा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

करोना काळात आरोग्य खात्यामध्ये मोठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये सागरला आरोग्य खात्यामध्ये नोकरीला लावून देतो असे आरोपी यांनी योगेश गुडघे यांना अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून योगेश यांनी 16 मे पासून वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात आरोपी यांना चार लाख रूपये दिले. सागरला आरोग्य खात्यामध्ये नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे योगेश यांच्या लक्षात आले. याप्रकरणी तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या