Friday, May 15, 2026
HomeनाशिकNashik Suicide News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांची आत्महत्या

Nashik Suicide News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांची आत्महत्या

एक महिलेचाही समावेश, कारणांचा तपास सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या (Suicide) केल्याचे शनिवारी (दि.२०) उघडकीस आले. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. कारणे समाेर आली नसल्याने शहर पोलिसांनी (City Police) घटनांचा तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंद नगर येथील राहुल नगर परिसरात जयंत सिद्धराम शिंदे (३७) यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी (दि. २०) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून रोहित भाऊसाहेब वाजे (२३, रा. भगूर) याने आत्महत्या केली. रोहित याने शनिवारी सकाळी अकराच्या समुारास विहीतगाव येथील अष्टपद हाईट्स इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात गंभीर मार लागल्याने रोहितचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत राजबाला गुजर (२८, रा. देवळाली कॅम्प) यांनी शनिवारी दुपारी घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तर चौथ्या घटनेत शिंदेगाव येथील नायगाव रोड परिसरात राहणाऱ्या राजेंद्र भास्कर अहिरे (४७) यांनी शनिवारी सकाळी घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

जगदंबा

Ashok Kharat Case: जगदंबा पतसंस्था ३२ बनावट खात्यांमधील व्यवहारांची होणार चौकशी;...

0
सिन्नर | प्रतिनिधीसिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन तथा जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आवारे बुधवारी...