Wednesday, March 26, 2025
HomeनाशिकAccident News : नाशिकमध्ये आयशर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच...

Accident News : नाशिकमध्ये आयशर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

नाशिक | Nashik

शहरातील आडगावजवळ (Aadgaon) आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा (Eicher Truck and Maruti Brezza) या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नवीन सिडको परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरून (Mumbai Aagra Higway) नाशिककडून आडगावकडे एक आयशर ट्रक हा कोंबड खत घेऊन जात होता. हा ट्रक शुक्रवारी (दि.१२) रात्री ११ च्या सुमारास नाशिक आडगाव मुंबई महामार्गाने विरुद्ध दिशेने जात होता.

हे देखील वाचा : कार अपघातात तीन जण गंभीर जखमी

यावेळी ट्रकचालक दारू (Drink) पिलेल्या अवस्थेत असल्याने तो विरुद्ध दिशेने वेगात ट्रक चालवत होता. त्याचवेळी त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक दुभाजक तोडून थेट विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या ब्रिझा कारवर आदळला. त्यामुळे या भीषण अपघातात कार मधील चौघे जागीच ठार झाले. तर ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत.

हे देखील वाचा : भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा; एफडीएची सिन्नरमध्ये कारवाई

दरम्यान, या अपघातात सज्जू शेख, अक्षय जाधव राहणार इंदिरानगर आणि अरबाज तांबोळी व रहेमान तांबोळी राहणार लेखानगर यांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...